कुंभ राशिची मुल कुठल्याही प्रकारची काम करण्या साठी लालायित असतात. ही मुल बुद्धिमान आणि चलाख असतात. याना वाईट सवयी खूप लवकर लागतात. त्या मुळे या राशीच्या मुलांच्या पालकांना आपल्या मुलां वर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लापरवाही झाली तर ही मुल वाईट संगतीत पडतात.
या राशीच्या मुलांनी जर अभ्यासात लक्ष दिल तर हे त्यांच्या साठी उत्तम असेल. यांच्या पालकांच हे कर्तव्य आहे कि या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे व या मुलांना प्रेरित करावे. ही मुल खेळ, कला, संगीत, नृत्य आणि नाटकाच्या क्षेत्रात चांगले करू शकतील या क्षेत्रात यांच्या चांगल्या प्रदर्शना साठी या मुलांना प्रोत्साहित करत राहावे.
ही मुल सोशल लाइफ मध्ये राहणे अधिक पसंत करतात. जास्तीत जास्त मित्र बनवण्याची याना आवड असते. या मुलांचा स्वभाव थोडा हट्टी आणि तार्किक असतो. यांचे हृदय खूप कोमळ आणि प्रांजळ असते. दुसऱ्या राशीच्या मुलां पेक्षा कुंभ राशिची मुल लवकर बिगडतात. आई-वडिलांना या मुलांवर लक्ष देण्याची गरज आहे. ही मुल आपल्या चालाकीने आपल्या गोष्टी मनवून घेण्यात तरबेज असतात.