कुंभ राशिची लोक दयावान असतात त्यांच्या व्यवहारात स्वतंत्रता बरोबर जटिलता पण पाहायला मिळते. प्रतिभावान असणाऱ्या या राशीची लोक दुसऱ्या लोकांना कुठल्या रहस्या पेक्षा कमी वाटत नाहीत. प्रेमात पडल्या वर ही लोक आपले नाते आणि आपल्या भविष्या बाबत विचार करतात. खूप विचार विमर्श केल्या नंतरच ही लोक प्रेमात पडतात. यांचे वैशिट्य असते कि हे पूर्ण नि:स्वार्थ भावानी प्रेमात पडतात. व यांचे हे वैशिट्य दुसऱ्यांना यांच्या प्रति आकर्षित करते.
प्रेमाच्या अतिरिक्त ही लोक आपली मित्रता देखील पूर्ण निष्ठेनी निभावतात. यांचे व्यक्तित्व दूरदर्शी आणि आकर्षित करणारे असते. आपल्या या गुणां मुळे या लोकांच्या जीवनात मित्रांची कमी भासत नसते.
यांचा आधुनिक व्यवहार यांच्या प्रेम संबंधात झळकतो. प्रेमात परीक्षण यांना आवडते. किती तरी वेळा यांचे खुल्ले विचार यांच्या साठी समस्या उत्पन्न करतात. कधी कधी ही लोक मित्र आणि प्रेमात भेद करू शकत नाहीत. प्रेमाच्या बाबतीत ही लोक खूप ईमानदार असतात. हे आपल्या जोडीदाराला पूर्ण स्वतंत्रता देतात. ही लोक आपल्या जोडीदाराला त्याच्या सफळतेत नेहमी पुढे जाण्यासाठी मदत करतात. या राशीच्या लोकांना प्रेमात समर्पणाच्या भावनेला समजायला पाहिजे जर प्रेमात संशय ठेवला नाही तर यांच्या साठी उत्तम असेल.