कुंभ राशिची महिलाआकर्षित, स्वतंत्र आणि आपल्या मनाचे करणारी असतात. या स्रिया पहिल्या भेटीतच कोणालाही वेड लावणाऱ्या असतात. या आकर्षक असतात. यांच्यात आपल्या गोड बोलीने दुसऱ्यांना आपल्या कडे आकर्षित करण्याची चांगली क्षमता असते.
या स्रीयांच्या मित्रांची लिस्ट खूप लांबलचक असते. या स्रिया आपल्या गोष्टी सगळ्यान समोर जाहीर करणे पसंत करत नाहीत. जीवनात येणाऱ्या कठीण वेळी या स्रिया एकट्या त्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यात सक्षम असतात. यांना आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आणि लळा असतो. हे त्यांच्या खुशी साठी काहीही करायला तयार असतात.
आपल्या निजी जीवनात अन्य कोणाचाही हस्तक्षेप यांना बिलकुल पसंत नसतो. यांची रजामंदी अर्थात परमिशन नसेल तर यांच्या जीवनात कोणी ही बदलाव आणण्याचा प्रयत्न केला तर ही लोक खूप वैतागतात व त्याना हे बिलकुल आवडत नाही. आपले मित्र आणि आपल्या जवळच्या लोकांना शिवाय दुसऱ्यानचा दिला गेलेला सल्ला या लोकांना आडवत नाही.
या राशीच्या स्रिया प्रेमाच्या बाबतीत लवकर कोणाच्या ऐकण्यात येत नाहीत. यांचा स्वभाव थोड़ा फ्लर्टी असतो. या स्त्रियां प्रेम संबंध लवकर बनवतात परंतु ते संबंध लग्ना पर्यंत पोहचवण्या साठी घाई करत नाहीत.