अग्नि तत्वाची रास आहे मेष जिचा स्वामी मंगळ ग्रह आहे. ही रास असणाऱ्या व्यक्तीची ओळख त्यांचा स्वतंत्र एवं अति विश्वसनीय स्वभाव आहे. ही लोक धैर्यवान, साहसी आणि पराक्रमी असतात. या लोकाना जीवनात रिस्क घेणे पसंत असते परंतु यांच्या स्वभावात अहंकार जास्त असतो.
मेष रास असणाऱ्या व्यक्ती मध्ये ऊर्जा भरपूर असते. यांच्या चेहऱ्या वर लहान बाळा सारखी मासूमता असते. अशी लोक आपले जीवन आपल्या इच्छेनुसार जगतात.यांना आपली विचारधारा आणि पसंतीच्या बाबतीत आडजस्टमेंट करणे पसंत नसते.
आपल्या उद्देशाला प्राप्त करण्या साठी ही लोक खूप परिश्रम करतात. तस पाहायला गेल तर या राशीच्या लोकां मध्ये खूप उत्साह पाहायला मिळतो परंतु ही लोक कुठल्याही कामाचा शेवट पर्यंत आपला उत्साह कायम ठेऊ शकत नाही. याचं खास वैशिट्य आहे कि ही लोक किती ही कठीण काम असेल तर ते हसून पूर्ण करतात.
जर कामात असफळता मिळाली तर त्या कामाच श्रेय दुसऱ्या लोकाना देतात परंतु सत्य हे आहे कि यांच्या असफळतेच कारण यांचा आळस आणि कामाच्या प्रती अनिच्छा असते.
प्रेमाच्या बाबतीत ही लोक जास्त रोमांटिक नसतात परंतु यांचे प्रेम खरे असते. हे पूर्ण समर्पण भावनेणी प्रेम करतात.