मकर राशिच्या स्त्रियां अत्यंत सहनशील असतात.या आपल्या नवरा आणि मुलां वर खूप प्रेम करतात.या महिला स्वाभिमानी असतात आणि कुठल्याही स्थितिचा सामना करण्यात दक्ष असतात.
या स्रिया खूप प्रतिभावान असतात. स्वभावाणी जिद्दी असतात आणि आपल्या निर्णया वर अडिग असतात. या स्रिया स्वतंत्र विचाराच्या असतात यांच्यात जन्मजात नेतृत्व करण्याचे गुण असतात. तसे पाहायला गेले तर या स्रिया शांत असतात परंतु जरुरत पडली तर या आपल्या रागानी दुसऱ्यांना चूप करण्यात माहीर असतात.
यांच्यात खूप चांगल्या प्रमाणात आत्मनिर्भरताची प्रवृत्ति असते. या अन्याय आणि भेदभाव बिलकुल पसंत करत नाहीत. प्रेमाच्या बाबतीत या महिला खूप चतुर असतात. या पहिल्या भेटीतच कोणाच्या प्रेमात पडणे पसंत करत नाहीत. यांच्या साठी प्रेम एक गंभीर मुद्दा आहे जो योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती बरोबर होणे गरजेचे आहे.