Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeGand mool nakshatra

गगंडमूळ नक्षत्र



 
By clicking on below button I agree T & C and Astrovidhi can call me for further consultation.

काय आहे गंडमूळ नक्षत्र?

शास्त्रात एकून 27 नक्षत्रांचा उल्लेख केला गेला आहे. यातील काही नक्षत्र शुभ असतात तर काही नक्षत्र अशुभ मानले जातात. या अशुभ नक्षत्रांना गंडमूळ नक्षत्र म्हणतात. गंडमूळ नक्षत्रांच्या श्रेणीत अश्विनी, अश्लेषा, मघा, ज्येष्ठा, मूल और रेवती नक्षत्र येतात. अशुभ नक्षत्र आपला वाईट प्रभाव दाखवतात आणि शुभ नक्षत्र शुभ प्रभाव दाखवतात. ज्योतिष शास्त्रा अनुसार गंडमूळ नक्षत्रात जन्म घेणे अशुभ मानले गेले आहे. गंडमूळ नक्षत्रात जन्म झालेल्या व्यक्तीच्या जीवनात नकारात्मक फळदायक स्थिति उत्‍पन्‍न होते ज्यात वेळेच्या भिन्नतेच्या आधारावर वेगवेगळ्या प्रकारे अशुभ फळ मिळतात.

प्रभावित व्यक्ती-

गंडमूळ नक्षत्रात जन्म झालेला व्यक्ती केवळ आपल्या साठीच नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबां साठी परेशानीच कारण असतो परंतु हे लक्षात ठेवण्या योग्य गोष्ट आहे की या नक्षत्राचे शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे प्रभाव पडतात. अशुभ फळ मिळाले तर व्यक्ती आपल्या जीवनात अडचणीचा सामना करतो. असा व्यक्ती आपल्या वडिलान साठी कष्टकारी असतो. याच्या विपरीत शुभ फळ प्राप्त झाले तर व्यक्तीला उच्च पद प्राप्त करण्याची चांगली संधी मिळते. त्याला आपल्या मित्रांन पासून लाभ होतो. त्याची आवड भ्रमण करण्यात तसेच मनोरंजन संबंधी कार्यात जास्त असते. जीवनात अस्थिरता आणि बदलाव यांना आवडतात. जीवनात यांना मान-सन्मानाची प्राप्ति होते.

प्रभाव-

या सर्व नक्षत्रात एकून चार चरण असतात एवं प्रत्येक चरणा अनुसार व्यक्तिच्या आई-वडील, भावंड, किंवा कुटुंबातील अन्य कुठल्या व्यक्ती वर आपला प्रभाव दाखवायची सुरुवात करतात. गंडमूळ दोष वेगवेगळ्या कुंडली वर वेगवेगळे वाईट प्रभाव टाकतात.

याचा प्रभाव कुंडलीच्या या 6 नक्षत्रां पैकी कुठल्या एकात चन्द्रमाची स्थिति, कुठल्या भावात नक्षत्र स्थित आहे, पत्रिकेत दूसरे शुभ किंवा अशुभ ग्रहांचा कसा प्रभाव पडत आहे, कुंडलीत कुठल्या भावाचा स्वामी चंद्रमा या सर्व गोष्टीं वर निर्भर असते. जर हा दोष कुठल्या कुंडलीत बनत असेल तर याचे वेगवेगळे नकारात्मक प्रभाव वेगवेगळ्या कुंडलीत वेगळे असतात.

सहा नक्षत्रांच्या आधारावर त्यांचा प्रभाव-

1. अश्विनी

असा व्यक्ती राजा सारखे जीवन व्यतीत करतात. या नक्षत्रात जन्म झालेल्या व्यक्तीच्या वडिलांना कसले न कसले त्रास होत असतात. हे व्यक्ती समृद्ध असून कुठल्या उंच पदा वर कार्यरत असतात.

2. अश्लेषा

या नक्षत्रात जन्म झालेला व्यक्ती अनावश्यक वस्तुन वर आपले पैशे खर्च करत असतो. याना आई-वडिलां संबंधित त्रास होत असतात तसेच भावा बरोबर यांचे संबंध चांगले नसतात.

3. मघा

या नक्षत्रात जन्म झालेल्या व्यक्तीला आपल्या आई-वडिलां मुळे अडचणींचा सामना करावा लागतो. हे अत्यधिक धन कमवतात तसेच समृद्ध असतात.

4. ज्‍येष्‍ठा

या नक्षत्रात जन्म झालेल्या व्यक्तींचे आपल्या लहान भावांन बरोबर पटत नाही त्यांच्या बरोबर अनबन होत असते. हे स्वतः बाबत देखील नाखुश असतात. आपल्या आईच्या स्वभावा बाबत देखील ही लोक संतुष्ट नसतात.

5. मूल

या नक्षत्रात जन्म झालेल्या व्यक्तींना जमीन आणि प्रॉपर्टीत का नुकसान होते. यांच्या मुळे आई-वडिलांना कष्ट सोसावे लागतात. ही लोक खूप खर्चीली असतात.

6. रेवती

असे व्यक्ती स्वतः पासून संतुष्ट आणि खुश राहतात. यांना सरकार कडून लाभ होतो परंतु ही लोक पैशाची बर्बादी देखील करतात.

उपाय-

  • गंडमूळ नक्षत्रात जन्म झालेल्या मुलाच तोंड त्याच्या वडिलांना दाखवू नये तथा वडिलांच्या खिशात तुरटी (एक तुकडा) ठेवावी. त्या नंतर २७ दिवस लगातार नियमित २७ पाने मुळ्याची मुलाच्या डोक्याच्या एका साईडला ठेवावीत आणि दुसऱ्या दिवशी ती पान पाण्यात प्रवाहित करावीत.
  • दररोज महामृत्‍युंजय मंत्राचा जप करावा.
  • ब्राम्हण लोकांना जेवण चारावे.
  • जर कुठल्या मुलाचा अश्विनी, मघा किंवा मूल नक्षत्रात जन्म झाला असेल तर त्याला गणपतीची पूजा करायला पाहिजे. महिन्यातील कुठल्याही गुरुवार किंवा बुधवारी आशा लोकांनी हिरव्या रंगाचे वस्त्र, लहसुनिया यांचे दान करावे.
  • याच्या अतिरिक्त अश्लेषा, ज्येष्‍ठा आणि रेवती या नक्षत्रात जन्म झालेल्या मुलां साठी बुध पूजन करने मंगलकारी असते. या व्यक्तींनी कुठल्याही बुधवारी हिरव्या भाज्या, हिरवी कोथिंबीर, आवळा व कासेचे भांडे दान करावे.
  • अश्विनी, मघा आणि मूल नक्षत्रात जन्म झालेल्या मुलांनी गणपतीची आराधना करावी.
  • बुध देवताची पूजा करावी.
 
DMCA.com Protection Status