ज्योतिषशास्त्रा अनुसार कुण्डलीत राहु आणि केतुची विशेष स्थिति असल्या वर कालसर्प योग बनतो. कालसर्प दोषाच्या बाबतीत अशी मान्यता आहे कि हे व्यक्तीने पूर्व जन्मी कुठला जघन्य अपराध केला असल्या मुळे दंड किंवा श्रापाच्या रुपात त्यांच्या जन्मकुंडलीत हा योग बनतो.
जर कुंडलीच्या लग्न भावात राहु विराजमान असेल व सप्तम भावात केतु ग्रह उपस्थित असेल व बाकी दुसरे ग्रह राहु-केतुच्या एका साईडला स्थित असतील तर कालसर्प दोष योग निर्माण होतो.
काल सर्प दोष असलेल्या व्यक्तीला आपल्या स्वप्नात साप, पाणी आणि त्या बरोबरच स्वतः हवेत उडत असल्याचे दिसते तसेच कामात सारख्या अडचणी येतात आणि त्या बरोबरच आपल्या विचारात सारखे बदलाव येतात. कुठले ही काम करण्या आगोदर मनात नकारात्मक विचार येतात. अभ्यासात मन लागत नाही व असा व्यक्ती व्यसन करतो.
कालसर्प दोषानी पीडित असणाऱ्या व्यक्तीची तब्बेत खराब राहते. त्यांचे जीवन देखील कमी असते. हे कुठल्या असहनीय आजारांनी पीडित असतात. या लोकांना आर्थिक, व्यवसाय आणि करियरच्या क्षेत्रात खूप परिश्रम करावे लागतात. यांना मित्र आणि बिजनेस पार्टनर धोका देतात. सफळता प्राप्त करण्यात अडचणी येतात.
कुंडलीत कालसर्प दोष असल्या मुळे व्यक्तीचे लग्न उशीरा होते. त्याला जुन्या आजारांनी घेरलेले असते. अशा लोकांना पैतृक संपत्तिच्या बाबतीत नुकसान सोसावे लागते. हा दोष असणाऱ्या लोकां बरोबर वाहन दुर्घटना होण्याची संभावना असते. यांच्या आत्मविश्वासात कमी येते. हे कानूनी समस्या तसेच पैशा-पाण्याच्या बाबतीत परेशान असतात. या योगात उत्पन्न व्यक्तीच जीवन व्यवसाय, धन, परिवार आणि संतान या बाबतीत अशांत असते. त्याला जीवनात अत्याधिक दु:ख भोगावे लागतात.