सिंह रास असणाऱ्या लोकां साठी प्रेम कुठल्या कथा या रोमांटिक चित्रपटा पेक्षा कमी नसते. ही लोक खूप रोमांटिक स्वभावाची असतात. यांचा हा स्वभाव यांना एक चांगला जोडीदार बनवतो. प्रेमाच्या सहवासात यांच्यात उत्साह आणि आनंदाचा संचार पाहायला मिळतो. प्रेमाची अनुभूति यांना रोमांचित करते. जीवनात प्रेम होणे यांच्या साठी कुठल्या उपहारा पेक्षा कमी नसते.
ही लोक जिंदादिल स्वभावाची असतात. प्रेमात यांना बंधन आणि रोकाटोकी अजिबात आवडत नाही. आपल्या राशी प्रमानेच ही लोक आपल्या प्रेमात स्वतःला एखद्या राजा प्रमाने समजतात. प्रेम संबंधात समर्पण आणि सुरक्षा ही यांची गरज असते. नात्यात जेवढे प्रेम, समर्पण आणि उदारता ही लोक दाखवतात तेवढीच आपल्या जोडीदारा कडून अपेक्षा ठेवतात.
या लोकांच्यात उत्साह, स्नेह आणि प्रेमात कसलीही कमी नसते.आपल्या जोडीदारा वर हि लोक खूप प्रेमाचा वर्षाव करतात. ते आपल्या जोडीदाराची चांगल्या प्रकारे देखभाल करतात आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. प्रेमात दिखावा करणे देखील यांच्या प्रेम करण्याचा एक अंदाज आहे. या राशीच्या लोकांच्यात एक चांगला जीवनसाथी बनण्याचे सगळे गुण असतात.