तूळ रास असणऱ्या पुरुषां जवळ प्रत्येक गोष्टीच उत्तर असते. हे पुरुष दुसर्यांच्या मदती साठी नेहमी तयार असतात. या पुरुषां मध्ये भरपूर ऊर्जा असते. यांच्यात लोकांना परेशान करण्याची प्रवृत्ति असते. यांच आकर्षण एवढे छान असते कि तुम्ही त्यांना सोडू शकत नाही. हे पुरुष चलाक आणि घमेंडी असतात. यांच्या प्रेमात कुठली ही स्री स्वतःला दूर करू शकत नाही. या राशीच्या पुरुषांचे व्यक्तित्व खूप आकर्षित असते व यांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्या वर प्रसन्नताचे भाव पाहायला मिळतात.
हे पुरुष कुठल्या ही परिस्थितित विचलित होत नाहीत. यांचा स्वभाव खूप सहयोग करणारा असतो. आपल्या मैत्रीत या लोकांची खूप प्रशंसा होते हे पुरुष चांगले वफादार मित्र असतात. थोड्या वेळा पुरते तरी हे पुरुष व्यसना प्रति आकर्षित होतात.
प्रेम संबंधात हे पुरुष भावुक होतात. हे पुरुष स्रीयांच्या बाबतीत लवकर आकर्षित होतात परंतु जीवनभर एकमेकान बरोबर राहण्याचा निर्णय खूप विचार विमर्श करूनच घेतात.