मंगळ हा पाप ग्रह आहे त्या मुळे ज्योतिषानुसार जन्मकुंडलीत असणाऱ्या मंगळ ग्रहाच्या दोषाला मंगळ दोष म्हणतात. कुंडलीत मंगळ ग्रहाच्या स्थितिच्या आधारा वर मंगळ दोष निर्भर असतो. मंगळ दोष कुंडलीत आहे हे माहित झाल्या नंतर लोक घाबरतात कारण याचा प्रभाव लग्ना नंतर खूपच घातक सिद्ध होतो. हा मंगळ दोष वैवाहिक सुखात बाधा उत्पन्न करतो. मंगळ दोषा बाबत लोकांची ही अतूट धारणा आहे कि ज्याच्या कुंडलीत हा दोष असेल त्याच लग्न देखील आशा व्यक्ती बरोबर केल गेल पाहिजे ज्याच्या कुंडलीत मंगळ दोष असेल. त्या नंतरच त्याचं लग्न व त्याचं वैवाहिक जीवन सुरळीत चालते.
मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तीच्या लग्नात विलंब होण्याचे व अडचणी येण्याचे कारण आहे मंगळ ग्रहाचा एकाकी स्वभाव. मंगळ ग्रहाला एकटे राहणे आवडते. त्या मुळे दुसरा एखादा ग्रह जेव्हा मंगळ ग्रहा जवळ येतो तेव्हा मंगळ त्याच्याशी भांडायला लागतो. मंगळ ग्रहाच्या या स्वभावा मुळे मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तीचे आपल्या जोडीदारा बरोबर पटत नाही व त्यांच्या वैवाहिक संबंधात बाधा उत्पन्न होते.
मंगल ग्रहाला युद्धाचा देवता म्हंटल जात कारण या मंगळ ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव ही दुसऱ्यान पासून वेगळे राहण्याचा असतो. ही लोक दुसऱ्यान बरोबर राहणे पसंत करत नाहीत. हे क्रोधी स्वभावाचे असतात. या ग्रहाच्या प्रभावा मुळे व्यक्ती क्रोधी, भांडण-तंटा करणारा किंवा वाद विवादात पडणारा असतो. मंगळाच्या प्रभावाणी ग्रसित व्यक्ती भांडण, वाद-विवादा पासून किती ही लांब राहण्याचा प्रयत्न करत असला तरी दुसऱ्यान द्वारे अस काही केल जात की या लोकांना क्रोध जनित निर्णय घ्यावेच लागतात. ही लोक चिडखोर आणि भांडखोर असतात.
या प्रकारचा दोष व्यक्तीच्या वयाच्या 18 वर्षा नंतर समाप्त होतो. याचा दुष्प्रभाव खूप कमी होतो एवं याच्या निवारण हेतू पूजन एवं अनुष्ठान केले जावू शकते. शांति पूजा करून देखील या प्रकारच्या दोषाला पूर्णतः समाप्त केल जाऊ शकते.
जर तुमच्या कुंडलीत डबल या ट्रिपल मंगळ दोष असेल तर याला एकाधिक मंगळ दोष म्हणतात. या दोषाला समाप्त करण्या साठी या दोषाचा उपाय कुंभ विवाह अर्थात यात मातीच्या पॉट बरोबर विवाह केला जातो. विवाह झाल्या नंतर मातीचा पॉट वाहत्या पाण्यात प्रवाहित केला जातो. हा उपाय केल्यानी मंगळ दोष पूर्णतः दूर होतो.