Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeNaag dosha

नाग दोष



 
By clicking on below button I agree T & C and Astrovidhi can call me for further consultation.

काय आहे नाग दोष?

ज्‍योतिष शास्त्रा अनुसार राहु ग्रहाचा संबंध नागाशी असतो. राहुच्या प्रभावा मुळे उत्‍पन्‍न होत असणाऱ्या दुर्दैवी योगाला ही नाग दोष म्हणतात. जेव्हा कुंडलीत राहु आणि केतु पहिल्या घरात चन्द्रमा बरोबर किंवा शुक्र ग्रहा बरोबर विराजमान असतो अशा वेळी कुंडलीत नाग दोष बनतो. कुंडलीत या दोषाचे असणारे बळ आणि स्थिति अनुसार ही व्यक्तीला जीवनात त्रास आणि अशुभ फळांची प्राप्ति होते.

कालसर्प आणि नाग दोष या मध्ये अंतर

किती तरी लोकांच्या डोक्यात हा भ्रम असतो कि कालसर्प आणि नागदोष एक समान आहे परंतु हे सत्‍य नाही. कालसर्प दोष वंशानुगत असतो आणि नाग दोषाचा प्रभाव व्यक्तीच्या मृत्‍यु नंतर ही प्रभावकारी असतो. याच्या अतिरिक्त अन्य सात ग्रहांची राहु किंवा केतु बरोबर युति झाल्या नंतर कालसर्प दोष बनतो दुसऱ्या बाजूला पाहायला गेले तर पहिल्या, दुसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि आठव्या घरात राहु-केतुचा प्रवेश असेल तर नाग दोषाचा कुंडलीत जन्‍म होतो.

कारण

  • देह संस्‍कारात उशीर झाला असेल किंवा कुठल्या अनोळखी मानसा द्वारे अंतिम संस्‍कार केल्या मुळे नाग दोष बनतो.
  • जेव्हा शरीरातील सर्व अंगाचे एकाच वेळी दाह संस्‍कार केले गेले नाही तर हा दोष निर्माण होतो.
  • जर कुठल्या व्यक्तीचा मृत्‍यु दुर्घटना, बम ब्‍लास्‍ट, आत्‍महत्‍या किंवा विष पिल्यानी झाला असेल तर नाग दोष उत्पन्न होतो.
  • कुठल्या नवीन जन्माला आलेल्या बाळाची तुमच्या पूर्वजां द्वारे हत्‍या एवं काळा जादू केल्यानी हा दोष लागतो.

प्रभावित व्यक्ती

नाग दोषांनी पीडित असणाऱ्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात किंवा लग्न उशीरा होते किंवा घटस्पोट संभाव असतो. स्रियान साठी हा दोष कुठल्या श्रापा पेक्षा कमी नसतो. या दोषाच्या प्रभावा मुळे गरोदर बायकांचा गर्भपात होण्याची संभावना जास्त असते. यांच्या जोडीदाराचे आरोग्य खराब राहते. या लोकांना स्वप्नात साप दिसतात. यांचा मानसिक विकास खूप हळू हळू होतो. या दोषा मुळे व्यक्तीची संतती त्याची विरोधी बनते असा व्यक्ती वाईट कार्यात लिप्त राहतो.

प्रभाव

नाग दोष असल्या वर व्यक्तीला कुठला जुना आजार उद्भवतो. त्यांना आपल्या परिश्रमाच फळ मिळत नाही. नाग दोषाचा अत्‍यंत भयंकर प्रभाव बायकां वर पडतो यांना संतान उत्‍पत्तित अत्‍यधिक अडचणी येतात.अशा व्‍यक्‍तिचा भयंकर अपघात होण्याची संभावना असते. यानां सारख्या सारख्या दवाखाण्याच्या फेरा घालाव्या लागतात. यांचा आकस्‍मिक मृत्‍यु होणे संभव असते. या लोकांना उच्‍च रक्‍तदाब आणि त्‍वचा संबंधी आजार होतात. नुकसान

नुकसान

नाग दोषाचे अत्‍यधिक नुकसान स्रियांना होते. या दोषाच्या प्रभावा मुळे स्रियांना संताती प्राप्तीत खूप अडचणी येतात. अधिकतर आरोग्य चांगले राहत नाही.

उपाय

  • नाग दोषाच्या प्रभावाला कमी करण्या साठी षष्टीच्या दिवशी सर्प परिहार पूजा करावी व पूजा संपल्या वर स्‍नान अवश्‍य करावे.
  • नियमित भगवान शंकराची पूजा करावी आणि शिवलिंगा वर दूध आणि जल अर्पण करावे. दररोज 108 वेळा 'ऊं नम: शिवाय:'आणि 'दोष निवारण मंत्राचा ' जप करावा. कपाळा वर चंदनाचा टिळक लावावा.
  • मंगळवार आणि शनिवारी शेषनागाची पूजा करावी. हे पूजन कमीत कमी 18 आठवडे करावे.
  • घरात मोरपंख ठेवावे.
  • नागपंचमीच्या दिवशी महाभारत पाठ करावा आणि कुठल्या ज्योतिषाचा सल्ला घेवून पंच धातुची अंगठी धारण करावी.
  • गोमेद रत्नाची चांदीची अंगठी मधल्या बोटात घालावी.
  • नरसिम्‍हा हेतु पूजा आयोजित करावी.
  • जीवनसाथी बरोबर कुठल्या धार्मिक जागी जावून प्रार्थना करावी.
  • 42 बुधवार कुठल्या गरीब एवं जरूरतमंद व्‍यक्‍तिला डाळ दान द्यावी.

काय करू नये

  • एकादशी, शिवरात्रि, अष्‍टमी आणि गोकुलाष्‍टमी सारखे उपवास केल्या वर कुठल्या ही प्रकारच्या पूजेचे आयोजन करू नये. शुभ दिवशी घरातच पूजा करावी.
  • कुठल्याही नागाच्या देवळात पाया पडू नये.
  • घरात पूजा करताना सगळ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • मासिक धर्म झाल्यावर बायकांनी नागाच्या देवळात प्रवेश करू नये. गरोदर बायकांनी नागाच्या देवळात जाऊ नये.
  • भोजन करण्या आगोदर पूजा संपन्‍न करावी.
 
DMCA.com Protection Status