पंच महापुरुष योग एक असा योग आहे ज्यात व्यक्तीला सगळ्या प्रकारही सुख मिळतात. हा योग आपल्या राशीत 5 ग्रह उपस्थित असल्या वर तसेच ते ग्रह उच्च होवून केन्द्र जागी स्थित झाल्या वर बनतो. 5 ग्रह असे आहेत- मंगळ, गुरु, शुक्र, बुध व शनि यांच्या पैकी एक ग्रह किंवा एकाधिक ग्रह कुठल्या विशिष्ट स्थितित असल्या वर हा योग बनतो.
जेव्हा कुंडलीत मंगळ उच्च स्थानात स्वग्रही, मूळ त्रिकोणात बसून केंद्र स्थानात असेल तर मंगळ ग्रहाच्या या स्थितिला रुचक योग म्हणतात. या योगात जन्म झालेल्या व्यक्तीच्या शरीराचा बांधा मजबूत असतो आणि चेहऱ्या वर विशेष कांती असते. असे व्यक्ती धनी, शस्त्र व शास्त्र याच्या बाबत चांगले ज्ञान ठेवणारे असतात. मंत्र क्रियेत निपुण असतात. यांना सरकार द्वारे सन्मान मिळतो. हे शत्रुंच मन जिंकणारे, कोमळ मनाचे, त्यागी,धनी सुखी, सेनापति आणि वाहन प्रेमी असतात. या योगानी प्रभावित असणारा व्यक्ती पोलीस, राजकारण, आर्मी,, शारिरिक शक्ति युक्त कार्यात पुढे असतात, मशीन विभाग तथा उर्जा विभागा विषयी क्षेत्रात काम करतात.
हा योग तेव्हा बनतो जेव्हा बुध ग्रह केंद्रात आपल्या स्वराशीत अर्थात मिथुन किंवा कन्या राशीत असतो. या योगानी प्रभावित व्यक्तीची हात खूप लांब असतात. ही लोक विद्वान् असून वार्तालाप करण्यात कुशल असतात. बोलचालीत त्यांच्या समोर कोणी जिंकू शकत नाही. यांच्या चेहऱ्या वर सिंहा सारखे तेज आणि वेग हात्ती सारखा असतो. असा व्यक्ती श्रेष्ठ प्रसाशक, निपुण, विपुल सम्पदा, प्रज्ञावान, धनी, सन्माननीय आणि दयावान असतो. असा व्यक्ती अंकगणिता संबंधी कार्य, बैंक, चार्टेड अकाउंट, क्लर्क, शिक्षक तथा विदेश सम्बंधी कार्य करतो.
हा योग व्यक्तीच्या कुंडलीत तेव्हा बनतो जेव्हा गुरु ग्रह धनु, मीन आणि कर्क राशि या पैकी कुठल्या एका राशीत होवून केंद्र स्थानी बसला असेल. या योगानी प्रभावित व्यक्ती सुन्दर, सुमधुर वाणीचा प्रयोग करणारा तसेच नदी किंवा समुद्राच्या जवळपास राहणारा असतो. असा व्यक्ती राजा सारखे जीवन जगतो. यांना कफ संबंधित आरोग्या बाबत त्रास होतात. ही लोक सुंदर, सुखी, शास्त्र जानणारे, ज्ञाता, निपुण, गुणी आणि सदाचारी एवं धार्मिक प्रवृतिचे असतात.
पहा योग तेव्हा बनतो जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह वृषभ, तूळ किंवा मीन राशित होवून केंद्रात स्थित होतो. या योगानी प्रभावित असणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्या वर चंद्रा सारखी कांती असते. अशी लोक युद्ध आणि राजकारणात निपुणता प्राप्त करतात असे व्यक्ति स्त्री, पुत्र, वाहन, भवन आणि अतुल संपदाचे मलिक असतात. यांचा स्वभाव तेजस्वी, विद्वान, उत्साही, त्यागी,चतुर असतो. ही लोक फैशन, कलाकार, सौंदर्य प्रसाधन, कवि, नाटक कार, गुरु तसेच सामाजिक कार्याशी संबंधित क्षेत्रात आपले नाव व पैसा कमवतात.
या योगाने प्रभावित व्यक्तिच जीवन कुठल्या राजा सारखे असते. हा योग शनिच्या मकर, कुम्भ किंवा तूळ राशिचा होवून केंद्र जागी उपस्थित झाल्या वर बनतो. शश योगात व्यक्ती सेनापति, धातु कर्मी, विनोदी, क्रूर बुद्धि, जंगल–पर्वत या जागी फिरणारा असतो. यांच्या डोळ्यात क्रोधाग्नी चमकते. असे व्यक्ती तेजस्वी, भ्रातृ प्रेमी, सुखी, शूरवीर, श्यामवर्ण, तेज बुद्धी आणि स्रीयांच्या बाबतीत आवड ठेवणारे असतात. असे व्यक्ती वैज्ञानिक, निर्माणकर्ता, भूमि सम्बंधित कार्यात संलग्न, जासूस, वकील तथा विशाल भूमिचे मलिक असतात.
जर पंच महापुरुष योगाचा निर्माण करत असणाऱ्या ग्रहांवर पाप ग्रहांची दृष्टि पडली तर त्यांच्या द्वारे मिळणाऱ्या फळां मध्ये घट पाहायला मिळेल व त्या बरोबरच चारित्र्यात देखील खराबी पाहायला मिळेल.