कुंडलीच्या नवमं भावात सूर्य आणि राहुची युति झाल्या वर पितृ दोष योग बनत असतो. ज्योतिषशास्त्रा अनुसार सूर्य आणि राहु ज्या घरात बसलेले असतात त्या घरातील सर्व मिळणारी फळ नष्ट होतात. नववा घर धर्म संबंधित असतो. याला वडिलांचं घर देखील म्हणतात. अशी मान्यता आहे कि जर कुंडलीचे नववे घर खराब ग्रहानी पिडीत असेल तर हे आपल्या वाडवडिलांची अपूर्ण इच्छा असल्याच सूचक आहे. यालाच पितृदोष म्हणतात.
कारण - जर तुमच्या द्वारे कुठल्या सत्पुरूष, बाह्मण किंवा कुलगुरुचा अनादर केला गेला असेल तर तुम्ही पितृ दोषांनी पीडित असता. गो हत्या आणि आपल्या पित्रानां जल अर्पित न करणे या दोषाच मुख्य कारण आहे.
पितृ दोष एक असा दोष आहे ज्यात व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि त्याचे जीवन केवळ अडचणी आणि समस्यांनी ग्रासित असते. ही लोक आपल्या वयस्कर माणसांचा आदर-सन्मान करत नाहीत त्यांचा अपमान करतात आणि दुसऱ्यानच्या भावना समजून घेत नाहीत. यांच्या जवळ रुपये-पैशाची कमी असते व यांचे जीवन देखील दु:खात व्यतीत होते. ही लोक मानसिक आघाताचा सामना करतात. हा दोष असणारा व्यक्ती आपल्या घरात भांडण-तंटा करतात.
ज्या घरात किंवा व्यक्ती पितृ दोषांनी पिडीत असतो त्या जागी पुरुष कमी होतात. त्यांची संख्या कमी होण्याची सुरुवात होते. कुटुंबात भांडण आणि क्लेश होण्याची सुरुवात होते. हा दोष असलेल्या व्यक्तीला संतान सुखात कमी पाहायला मिळते. लग्नात उशीर होतो तसेच संतान प्राप्तीत अडचणी आणि आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. अशा लोकांच्या घरात नेहमी तोडफोड होत असते आणि घरात खूप ओलसर पाहायला मिळते. शास्त्रा अनुसार ज्या घरात मास-मदिरा याचे सेवन केले जाते तिथे देखील पितृ दोष असल्या मुळे कुटुंबातील लोकाना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो.
पितृ दोष खूप अमंगळकारी असतो. याच्या प्रभावा मुळे व्यक्तीचे जीवन नर्क असल्या सारखे होते. तो आपल्या वैयक्तिक जीवन चांगल्या प्रकारे जगू शकत नाही व पैश्या पाण्याची देखील समस्या उत्पन्न होत राहते. हा दोष असल्या मुळे लग्नात अडचणी, मानसिक तणाव आणि घरात समस्या उत्पन्न होतात. पितृ दोष मुळे जीवनात व्यक्तीला हार पाहायला मिळते.