वृश्चिक राशिचे पुरुष खूप महत्वाकांक्षी आणि जिद्दी असतात. यानां आपल्या कामात कोणाचा ही हस्तक्षेप करणे बिलकुल आवडत नाही. हे पुरुष दुसऱ्यांच्या चुका कधी ही विसरत नाही. योग्य वेळ आल्या वर ही लोक आपल्या प्रतिस्पर्धीला करारे उत्तर देतात. या लोकांची वाणी कडू असते यांच्या स्वभावात क्रोध अधिक असतो.
या राशीच्या लोकांना दुसऱ्या लोकांच्यात चुका काढायची सवय असते. याचं आपल्या आई वर अत्यधिक प्रेम असते. ही लोक आपल्या कुटुंबां वर जीवापाड प्रेम करणारी असतात. राजकारण आणि नीति आखण्यात हे पुरुष खूप चतुर असतात.
हे पुरुष गंभीर असतात व लहान-लहान गोष्टीं वर रागाला जातात.पूर्ण दुनिया या लोकाना रसहीन वाटते. यांच्यात सर्व काही जाणण्याची जिज्ञासा असते. हे आपल्या जवळपासच्या लोकां विषयी सगळी माहिती ठेवण्याचे इच्छुक असतात. ही लोक कुठल्याही परिस्थितित स्वत: वर नियंत्रित ठेवतात व धर्यानी काम करतात.
वृश्चिक राशिची लोक आत्मनिर्भर, निडर आणि महत्वाकांक्षी असतात. प्रेमाच्या बाबतीत हे पुरुष प्रभावशाली आणि कामुक असतात. हे खूप केयरिंग आणि ईमानदार साथी सिध्द होतात.