वृश्चिक राशिची लोक प्रेमात सगळ काही कुर्बान करण्या साठी तयार असतात. यांच्या साठी प्रेमच सर्व काही असते. त्या साठी ते काहीही करू शकतात. प्रेमात यांना शारीरिक सुखाच्या खूप आनंदाचा भास होतो परंतु यांच्या या विचारा मुळे लोक यांना वाईट समजतात. परंतु हे विचार या राशीच्या लोकां साठी खूप एखाद्या अध्यात्माला प्राप्त करण्या सारखे पवित्र असतात.
ही लोक साहसी, विनम्र आणि ईमानदार प्रेमी सिध्द होतात.प्रेम संबंधात सुरुवातीला ही लोक शांतअसतात परंतु आपल्या जोडीदाराला समजून घेण्या साठी खूप वेळ लावतात. हे आकर्षक व्यक्तित्वाचे असतात व सगळ्याचं लक्ष आपल्या कडे आकर्षित करतात. किती तरी वेळा लोक यांच्या कडे आकर्षित होतात परंतु ही लोक त्यांचा चुकीचा फायदा घेत नाही.
प्रेम संबंधात ही लोक खूप समतोल व्यवहार करतात. प्रेम झाल तरी ही ही लोक पूर्णता समर्पण भाव ठेवतात. ही लोक प्रेमात मजनू सारखी असतात. या लोकांना प्रेमात असुरक्षित असल्याचा भास होतो.