शनि साडेसाती म्हणजे काय?
शनि ग्रहाच्या कुंडलीत जन्माची रास तथा नावाच्या राशी पासून बाराव्या, पहिल्या किंवा दुसऱ्या भावात असल्या वर शनिच्या या गोचर स्थितीला साडेसाती म्हणतात. शनि साडेसाती चा काळ 7.5 वर्षा पर्यंत असतो. हा काळ खूप अशुभ मानला जातो.
याच्या प्रभावात व्यक्तीला अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. शनी अशुभ घरात असल्या मुळे व्यक्तीला नकारात्मक प्रभाव सोसावे लागतात परंतु परिश्रमी आणि ईमानदार लोकांना शनि शुभ प्रभाव प्रदान करतो.
प्रभावित व्यक्ती
- शनिच्या प्रभावात स्रिया निराशावादी बनतात.त्या आणि संवेदनशील होतात. दुसरी कडे पुरुष शनिच्या प्रभावात परिश्रमी बनतात तसेच त्यांची शारीरिक अंगकाठी खूपच कमजोर असते. यांना गर्दीच्या जागे पासून लांब राहणे आवडते. असा व्यक्ती आपल्या कामा बाबत प्रामाणिक असतो.
- वृषभ, तूळ, मकर आणि कुंभ राशिच्या लोकांना शनिचा दुष्प्रभाव कमी सोसावा लागतो. शनी सर्वात जास्त मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तीना त्रास देतो.
प्रभाव
- व्यक्ती आपल्या जीवनातील सकारात्मक पहलुनां ओळखण्यात असमर्थ होतो. त्याला आपल्या जीवनात काहीही आवडत नाही.
- आपल्या जवळ पास नकारात्मकता पाहून व्यक्ति स्वतःला कमजोर समजतो.
- शनिच्या साडेसातिच्या सुरुवातीला व्यक्तीला आरोग्या बाबत त्रास सोसावे लागतात.
- याच्या प्रभावात जो व्यक्ती येतो त्याच्या आई-वडिलांना त्रास सोसावे लागतात.
- शनिच्या साडेसातिच्या दुसऱ्या चरणात व्यक्तीला खूप जसर परिश्रम करावे लागतात.
- कुटुंबातील मोठ्या मानसाचा मृत्यु होण्याची संभावना असते.
- शनिच्या साडेसातीच्या तिसऱ्या चरणात व्यक्तीला मरणा सारखे त्रास सोसावे लागतात.
उपाय
- साडेसातीनी प्रभावित असणाऱ्या व्यक्तीला सात मुखी रुद्राक्षाची माळ धारण करायला पाहिजे.
- नीलम धारण केल्यानी देखील लाभ होईल.
- नियमित शंकराची आराधना करावी.
- नियमित सुंदरकाण्ड आणि हनुमान चाळीसा वाचावी.
- शनिवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल द्यावे. हा उपाय खूप प्रभावशाली असतो.
- शनीच्या साडेसातीच्या काळात काळ्या घोड्याच्या नाळे पासून बनवलेली अंगठी किंवा नावेच्या खिळ्या पसून बनवलेली अंगठी घालणे खूप लाभकारी असते.
- शनिवारी तिळ आणि तेलाच दान केल्यानी देखील शनि देव प्रसन्न होतात.
- ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती चालू आहे त्या लोकांना शनिवारी उपवास ठेवायला पाहिजे.
- उपवास केल्यानी आणि शनिवारी दान दिल्याने शनीच्या साडेसातीच्या काळात कमी त्रास सोसावे लागतात.
- शनि देवाशी संबंधित वस्तू जसे- काळी उडद डाळ,तीळ,लोखंड, काळे कपडे,इत्यादी दान करावे या मुळे शनी देव प्रसन्न होतात.
- शनि देवाच्या शांती साठी शनि दोष शांति यंत्राचा प्रयोग केला जावू शकतो.