कन्या रास असणाऱ्या मुलांचा स्वभाव शांत आणि उदार असतो. ही मुल कमी वयातच खूप समजदार असतात. यांच्यात दुसऱ्यान ची देखभाल आणि मदत करण्याची प्रवृत्ती असते. यांना जेवढ्या लवकर राग येतो तेवढ्या लवकर त्यांचा राग शांत देखील होतो. ही मुल लाजाळू असल्या मुळे लवकर कोणा बरोबर मिसळत नाहीत.
ही मुल दुसऱ्यांची आलोचना करतात पण यांची कोणी आलोचना केली तर ही मुल खूप लवकर रागाला जातात. यांच्यात प्रत्येक गोष्ट जाणण्याची तीव्र इच्छा असते त्या साठी ही मुल किती तरी प्रश्न विचारतात. या मुलांची शिकण्याची क्षमता खूप तेज असते. यांची शिक्षणात आवड असते. ही मुल आपल्या कामात खूप परफेक्ट असतात.
कामात व्यवस्थित पणा नसला तर ही मुल चिडखोर बनतात. या मुलांच्या आई-वडिलांना लहान पणा पासूनच या मुलांनाच मार्गदर्शन करायला पाहिजे. त्याना चांगली तालीम द्यावी. या मुलांना प्रोत्साहन मिळाल्या नंतर हे जीवनात चांगले प्रयास करून आपल्या ध्येयाला प्राप्त करतात.