कन्या राशिची लोक स्वभावानी भावुक असतात व आपल्या भावना दुसऱ्या समोर प्रगट करणे यानां आवडत नाही. या राशीचा ताळमेळ वृषभ आणि मेष राशिच्या लोकां बरोबर उत्तम असतो.
मेष -: मेष राशिच्या लोकांच्या वाईट सवयीना सकारात्मक बनवण्याची क्षमता कन्या राशिच्या लोकां मध्ये असते. या दोन्ही राशी एकमेकांच्या पूरक असतात. यांना आपल्या नात्यात ईमानदारी आणि प्रेमा शिवाय अन्य कुठल्याही वस्तुची गरज भासत नाही. यांच्यात एक आदर्श जोडी बनण्याचे गुण आहेत.
वृषभ -: जर कन्या राशिची लोक वृषभ राशीच्या लोकां बरोबर चांगला ताळमेळ ठेवून चालले तर याचं हे नात एक मिसाल बनू शकते. वृषभ राशिची लोक शांतअसतात तर कन्या राशिची लोक प्रेम आणि सेक्सच चांगले ज्ञान ठेवतात. या दोन्ही राशी एकमेकांच्या कमी आणि चांगुलपणाच्या पूरक असतात.
मिथुन -: या राशीची लोक बुद्धिमान आणि व्यावहारिक असतात. या दोघान मध्ये चांगला ताळमेळ असतो परंतु जरासा गैरसमज झाला कि यांच्यात कलह होऊ शकतील.
कर्क -: कर्क राशीची लोक संवेदनशील आणि सुस्त असतात तिथे कन्या राशीची लोक मार्किक आणि धैर्यवान असतात. वेगवेगळा स्वभाव असला तरी यांचा मेळ खूप चांगला व अनुकूल असतो.
सिंह -: कन्या राशीची लोक आपल्या भावना व्यक्त करताना थोडे हडबडून जातात परंतु सिंह राशीची लोक नेहमी दिखावा करतात. जर या दोन्ही राशीची लोक एकमेकांच्या भावनांचा सन्मान करतील तरच यांच्या मध्ये सामंजस्य स्थापित होईल.
कन्या -: या राशीची लोक आपले प्रत्येक काम पूर्ण निष्ठानी करणे पसंत करतात. यांच्यात प्रेमात स्पष्टवादिता आणि ईमानदारी पाहायला मिळते. कन्या सोबत कन्याचा मेळ झाला तर ही एक आदर्श जोडी बनते.
तूळ -:एकमेकांचे विचार आणि स्वभावला समजणे या दोन्ही राशीच्या लोकां साठी थोडे कठीण असते.यांच्या स्वभावात अत्यधिक विपरीत गुण असतात. यांच्यात अनुकूलता असंभव वाटते.
वृश्चिक -: या दोन्ही राशी परिश्रमी आणि आपल्या लक्ष्य प्राप्ति हेतु प्रयासरत असतात.यांचे नाते सुरुवातीला सावकाश परंतु हळू-हळू पुढे चालते.
धनु -: कन्या राशिच्या लोकांचा आलोचनात्मक व्यवहार धनु राशीच्या लोकांना अजिबात आवडत नाही परंतु नात्यात परस्पर समज आणि माफ करण्याची प्रवृत्ति जर आपल्या स्वभावात आणली तर हे नात टिकू शकते.
मकर -: या दोन्ही राशीची लोक एकमेकान वर विश्वास ठेवतात त्या मुळे यांच्यात चांगली अनुकूलता पाहायला मिळते. ही लोक जीवनाच्या प्रति गंभीर दृष्टिकोण ठेवतात म्हणून यांच्या नात्यात रोमांस कमी असतो.
कुंभ -: यांच्या मध्ये भावनात्मक संबंधाचा अभाव असतो. यांचे विचार एकमेकांशी जुळतात.अनुकूलताच्या स्तरा वर या दोन ठीकठाक असतात.
मीन -: कन्या राशिची लोक आत्मनिर्भर असतात तर मीन राशीची लोक कल्पनेच्या दुनियेत राहणे पसंत करतात व ही लोक गैर-जिम्मेदार असतात. यांच्या नात्यात थोडी अनुकूलता पाहायला मिळते.