कन्या राशिच्या लोकाना प्रेमात खुश आणि संतुष्ट करणे खूपच कठीण काम आहे. यांचे असे मानणे आहे कि लोक बाहेरून जशी दिसतात तशी आतून नसतात प्रेम असो किंवा कुठले ही काम असो ही लोक मन लावून करतात. आपले कुठलेही नाते पूर्ण ईमानदारीने निभावतात.
नात्यात प्रेम कायम राहावे त्या साठी हे जरुरी आहे कि यांचा दृढ़ स्वभाव आणि उच्च विचारा बाबत यांच्या जोडीदाराला माहित असावे. याच्या अतिरिक्त यांच्या जोडीदाराला हे कळावे कि आपल्या जोडीदाराच्या गंभीर स्वभावाला थोड प्रफुल्लित ठेवावे.
कन्या राशीची लोक उदार, समर्पित, ईमानदार आणि आपल्या कर्तव्याच पालन करणारी असतात. ही लोक आपल्या पार्टनर ची खूप काळजी घेतात. यांच्या लहान-लहान जरुरती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जोडीदारावर निर्भर राहणे यांची सवय नसते हे प्रत्येक परीस्थितत काम करणे पसंत करतात.
या लोकांचे जसे विचार असतात त्या विचाराचा जोडीदार यांना पसंत असतो. हे त्याला आपल्या सारखाच बनवण्याचा प्रयत्न करतात. यांचे मन शुद्ध आणि निष्कपट असते. ही लोक कधी-कधी आपल्या जोडीदारात असणाऱ्या कमी बाबत जास्तच आलोचनात्मक रूप धारण करतात.